Ad will apear here
Next
‘सह्याद्री हॉस्पिटल्स’तर्फे अडीच वर्षांत शंभर यकृतांचे प्रत्यारोपण

पुणे : येथील ‘सह्याद्री हॉस्पिटल्स’ने नुकतेच आपल्या डेक्कन येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शंभरावे यकृत प्रत्यारोपण केले. हे प्रत्यारोपण ‘लिव्हर सिरॉसिस’ने ग्रस्त सांगली आटपाडी येथील एका ४८वर्षीय पुरूष रूग्णावर करण्यात आले. यकृत प्रत्यारोपण यशस्वी करणार्याि तज्ज्ञांच्या समुहात ‘सह्याद्री हॉस्पिटल्स’चे हेपॅटोबिलियरी व यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. बिपीन विभूते, डॉ. अनिल वैद्य, डॉ. दिनेश झिरपे, लिव्हर आयसीयुचे मुख्य सल्लागार डॉ. चेतन पांडे, प्रत्यारोपण भूलतज्ञ डॉ. मनिष पाठक, डॉ. दिनेश बाबू, यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक  डॉ. शैलेश साबळे, समन्वयक अरूण अशोकन, अमन, राहुल तांबे आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला पाध्ये यांचा समावेश होता.

डॉ. बिपीन विभुते म्हणाले, ‘या शंभराव्या प्रत्यारोपणात यशाचे प्रमाण हे ८९ टक्के आहे. आमच्या या प्रवासामध्ये आव्हानात्मक यकृत प्रत्यारोपणाबरोबरच काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. मुत्रपिंड-स्वादुपिंड प्रत्यारोपण आणि महाराष्ट्रात करण्यात आलेल्या सर्वाधिक पिडियाट्रिक(बालकांमधील) यकृत प्रत्यारोपण यांसारख्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. याबरोबरच आम्ही एकाच वेळी यकृत, मुत्रपिंड आणि स्वादुपिंडाचेही प्रत्यारोपण केले आहे. ८४ वर्षीय ज्येष्ठ दात्याचे यकृत काढून गरजू रूग्णावर प्रत्यारोपण केले आहे, हे राज्यातील अशा प्रकारचे बहुधा पहिलेच प्रत्यारोपण असेल. प्रशिक्षित वैद्यकीय टीम, दर्जेदार वैद्यकीय उपचार पध्दती आणि किफायतशीर दरात सर्व आवश्यक सोयी सुविधांची उपलब्धता यामुळे सह्याद्री हॉस्पिटलमधील यकृत प्रत्यारोपणाच्या यशस्वितेचे प्रमाण अधिक आहे. जगभरात देखील यकृत प्रत्यारोपणातील यशस्वितेचे प्रमाण ९० टक्के आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘यकृत प्रत्यारोपणानंतर सुरूवातीचे काही दिवस रुग्णाची खूप काळजी घ्यावी लागते, त्याची उत्तम सोय येथे आहे. यकृत प्रत्यारोपणाचा खर्च कमी करण्यातही आम्ही यश मिळवले आहे. येथे १५ ते १८ लाख रुपयांमध्ये हे प्रत्यारोपण होते. गरीब रुग्णांना मुख्यमंत्री निधी, अन्य आर्थिक मदत योजनांद्वारे मदत मिळवून दिली जाते, हॉस्पिटलही अगदी माफक शुल्क आकारणी करते. पैशाअभावी उपचार रोखले जात नाहीत. नुकत्याच एका १५ वर्षांच्या गरीब रुग्णाचे यकृत प्रत्यारोपण अगदी माफक शुल्कात करून, त्याच्या नंतरच्या औषधोपचारांची आर्थिक तरतूदही हॉस्पिटलने केली आहे. अवयवप्रत्यारोपणाविषयी जागरुकता वाढणेही आवश्यक आहे.’   

याबद्दल बोलताना ‘सह्याद्री ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स’चे मुख्य कामकाज अधिकारी डॉ. सुनिल राव म्हणाले, ‘केवळ अडीच वर्षांच्या कालावधीत शंभरावे यकृत प्रत्यारोपण हा महत्त्वाचा टप्पा पार करणे, हा सर्वांकरिता एक अभिमानाचा क्षण आहे. यामुळे अनेकांना नवीन जीवन मिळाले याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. डॉ. विभुतेंच्या नेतृत्वाखाली असलेली प्रशिक्षित वैद्यकीय टीम, दर्जेदार वैद्यकीय उपचार पध्दती आणि किफायतशीर दरात सर्व आवश्यक सोयी सुविधांची उपलब्धता या सर्व गोष्टींचा या प्रक्रियेमध्ये मोलाचा वाटा आहे. सर्वांपर्यंत सुविधा पोहोचाव्यात याकरता आम्ही औरंगाबाद व नाशिक येथेदेखील यकृत प्रत्यारोपण केंद्र सुरू केले आहे; तसेच सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली, बारामती, अहमदनगर, इंदापूर येथील रूग्णांनादेखील लिव्हर ओपीडीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.’

डॉ. सुनिल राव पुढे म्हणाले, ‘अवयवदाते आणि त्यांच्या कुटुंबियांना अवयवदानाच्या महान कार्याबद्दल सलाम करत असतानाच, आम्ही आमच्या कर्मचार्यांूचे अभिनंदन आणि झेडटीसीसी आणि ट्रॅफिक पोलिस यांचे आभार मानतो. या सर्वांचाच या प्रक्रियेमध्ये मोलाचा वाटा आहे.’

प्रत्यारोपण भूलतज्ञ डॉ. मनिष पाठक म्हणाले, ‘अद्ययावत सुविधा, समर्पित डॉक्टरांची टीम आणि प्रशिक्षित कर्मचारी तसेच यकृत आजारांसाठी अखंड वैद्यकीय सेवा यामुळे हे यश शक्य झाले आहे. डॉ. बिपीन विभुते, डॉ. दिनेश बाबू, डॉ. दिनेश झिरपे, डॉ. शैलेश साबळे, डॉ. संदीप कुलकर्णी आणि प्रशिक्षित कर्मचारी व सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा याबरोबरच समर्पित लिव्हर आयसीयु व तज्ञांची टीम यामुळे रूग्णांना योग्य मार्गदर्शन मिळते;तसेच शस्त्रक्रियेनंतर रूग्ण जलद व लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी येथे रिहॅब टीम कार्यरत आहे.’

‘सह्याद्री हॉस्पिटल्स’च्या डेक्कन, हडपसर, नगररोडचे युनिट हेड डॉ. केतन आपटे म्हणाले, ‘मी आमच्या डॉक्टरांच्या टीमचे अभिनंदन करतो, ज्यांनी फक्त प्रत्यारोपण यशस्वी केले नसून, रूग्ण लवकरात लवकर बरा व्हावा यावर देखील लक्ष केंद्रीत केले. हा महत्त्वाचा टप्पा गाठला असला, तरी यापुढे अवयवदान जागृतीसाठी आम्ही अधिक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवू. दाते आणि त्यांचे कुटुंबियांना आम्ही सलाम करतो. नुकत्याच रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट 3131 बरोबर सहयोग करून जगातील सर्वांत मोठ्या अवयवदान प्रतिज्ञा मोहिमेत सहभाग नोंदविला. आठ तासांत सर्वाधिक अवयव दान प्रतिज्ञेसाठी या उपक्रमाची नोंदणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. आम्ही या उपक्रमात सहभागी झालो याचा आम्हाला आनंद आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZVZBS
Similar Posts
‘सह्याद्री हॉस्पिटल्स’तर्फे यशस्वी यकृत प्रत्यारोपण पुणे : ‘सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’तर्फे लिव्हर सिरॉसिसने ग्रस्त असलेल्या पुण्यातील ३८ वर्षीय रूग्णावर मंगळवारी, २४ जुलै रोजी यशस्वीरित्या यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. सोलापूर येथील एका ५३ वर्षीय रूग्णाला डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर अश्विवनी सहकारी रूग्णालयात मेंदूमृत घोषित करण्यात आले
‘सह्याद्री हॉस्पिटल्स’तर्फे मुलांच्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी विशेष कक्ष पुणे : लहान मुलांना होणाऱ्या अनेक असाध्य आजारांवरील सर्वोत्तम उपचार गरीब मुलांनाही उपलब्ध व्हावेत, या हेतूने ‘सह्याद्री हॉस्पिटल्स’तर्फे नगर रोडवरील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक विशेष उपचार कक्ष सुरू करण्यात आला आहे.
एकाच यकृताने दिले दोघांना जीवदान; पुण्यात ‘स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट’ यशस्वी पुणे : स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट अर्थात एकाच ब्रेनडेड रुग्णाच्या यकृताचे दोन भाग करून त्यांचे दोन वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये प्रत्यारोपण करण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश आले आहे. पुण्यात पहिल्यांदाच झालेल्या या स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांटमुळे अनेकांना आशेचा किरण मिळाला आहे.
मेंदूमृत तरुणाच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान पुणे : नुकतीच दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला कोल्हापूरमधील १८ वर्षीय तरुण दुचाकी अपघातामुळे मेंदूमृत झाला. त्याचे हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंडे दान करण्यात आल्याने चार रुग्णांना नवजीवन मिळाले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language